Ad will apear here
Next
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री
मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. आता राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली आहे. 

२४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला; मात्र शिवसेनेने पहिल्या दिवशीपासूनच आपल्यासाठी सगळे मार्ग खुले असल्याचे वक्तव्य करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, हीच भूमिका संजय राऊत आणि शिवसेनेने लावून धरली होती. त्यानंतर कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर चर्चांच्या अनेक फेऱ्यांनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकासआघाडी सरकार स्थापन होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. 

दरम्यान, आजची सकाळ उजाडली ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातमीने. राज्याला स्थिर सरकार देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नेत्यांनी या वेळी सांगितले. भाजपला हा पाठिंबा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने  दिला आहे, हे नंतर स्पष्ट झाले. लवकरच बहुमत सिद्ध करू, असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSPCG
Similar Posts
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच नोव्हेंबर रोजी केले.
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
‘आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल’ मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदणीकृत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे
‘कंपनी कर कमी केल्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला’ मुंबई: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतल्यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार असून, रोजगारनिर्मिती होईल. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार असून त्याबद्दल मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language